सुधारित उडीद लागवड पद्धत

नमस्कार आज आपण उडीद लागवड या संदर्भात सुधारित पद्धतीने, उडीद लागवड कशी करावी आपण या उडीद लागवडी बद्दल विशेष माहिती येणार आहोत.

माझ्या सर्व शेतकरी मित्रांसाठी आज आपण या ब्लॉग द्वारे उडीद या पिकाबद्दल आणि उडीद या पिकाची सुधारित अशी ही लागवड पद्धत आज आपण बघणार आहोत.

उडीद या पिकाबद्दल बोलायचे झाले तर उडते हे पीक सुमारे 70 ते 80 दिवसात पावसावर येणारे पीक आहे हे पीक मिश्र पीक पद्धतीसाठी अतिशय महत्त्वाचे पीक आहे. उडीद या पिकासाठी लागवडीसाठी मध्यम ते भारी चांगली होणारी जमीन निवडावी. शक्यतो पाणथळ, क्षारपड, तसेच उतारावरील हलक्या जमिनीमध्ये लागवड करू नये. जमिनीत वापसा येता म्हणजे पेरणीयोग्य पाऊस झाल्यावर जूनच्या मध्यंतरी याची लागवड करावी.

महत्त्वाची टीप पेरणी जर तुम्ही उशिरा केल्यास उत्पादनात घट येते आणि पेरणी 7 जुलै ते 10 जुलै या दरम्यान करू नये.

उडीद या पिकासाठी हेक्टरी पंधरा ते वीस किलो बियाणे वापरावे पेरणीपूर्वी प्रति किलो बियाण्यास कार्बेन्डाझिम 3 ग्रॅम किंवा ट्रायकोडर्मा 5 ग्रॅम यांची प्रक्रिया करावी.

आपण या ब्लॉक मध्ये काही  हे पाहणार आहोत.

मुख्यत्वे उडीद या जातीचे बऱ्याचशा जाती आहेत, पण आपल्या जमिनी योग्य आणि आपल्या वातावरणात ज्या जाती येथील त्याच्या संदर्भात मी आज तू माझ्याशी बोलत आहे.

सुधारित जाती खालील प्रमाणे.

टी ए यु – 1

ए के यु – 15

पिकेव्ही ब्लॅक गोल्ड

एन यु एल – 7

फुले वसु

फुले राजन

जर आपणास आंतरपीक घ्यावयाचे असल्यास उडदाच्या दोन ओळी एक ओळख तुरीची याप्रमाणे आंतरपीक घेतल्यास तुरीची जोमदार सुरुवात होण्यापूर्वी उडदाची काढणी पूर्ण होते.

त्याचप्रमाणे आपण आंतरपीक म्हणून उडीद आणि ज्वारी इत्यादी आंतरपिकांचा अवलंब करता येईल.

 

Leave a Comment